
उमरखेड तहसिलदार
उमरखेड:- दि. 31 ( उमाका) दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्याची आवश्यकता पडणार आहे. तसेच कोलाम (आदिम जमाती) आदिवासी लोकांची शासकीय लाभा करिता आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना लागणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येऊ नये म्हणून आज दिनांक 31 /मे/ 2024 रोजी माननीय तहसिलदार आर यु सुरडकर यांनी सर्व उमरखेड तालुक्यातील मुख्याध्यापक यांची सभा बोलवण्यात आली होती. माननीय तहसिलदार यांनी 13 जून 19 जून व 25 जून 2024 ला शिबीर घेण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.या दिवशी शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. असे उमरखेड माननीय तहसिलदार आर यू सुरडकर यांनी निर्देशित केले आहे. सभेला उमरखेड नायब तहसिलदार नकितवाढ , उमरखेड (पं स ) गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाढ महसूल सहाय्यक राजीव यलुतवाड व सर्व उमरखेड तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
