अति सघन (HDPS) कापूस Watch सुरू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शेतकऱ्यांना कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन व्हावे तसेच कमी कालावधीत पिक घेऊन दुसरे पिके घेऊन एकाच वर्षामध्ये दोन पिके घेऊन पिकाची फेरपालट होईल आणि पुढील वर्षी येणारे पिक चांगल्या पद्धतीने येईल जमीनीतील अन्नद्रव्ये या मध्ये वाढ होईल या उदात्त हेतुने केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपुरच्या मार्गदर्शन व सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, राशी सिडस प्रा.लि.व जिवनविकास कल्टिव्हेटर्स प्रोड्युसर कंपनी राळेगाव यांच्या सहकायार्ने यंत्राद्वारे कपाशी लागवड कपाशी सघन लागवड प्रकल्पा अंतर्गत राळेगाव तालुक्यातील बरडगाव, पिंपरी दुर्ग येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश वर्मा , पराग इंगोले यांच्या शेतात लागवड सुरू झाली आहे सदर शेतावर अती सधन कापुस लागवाड कार्यक्रमा अंतर्गत राशी 929 या कपाशी वाणाचे ट्रॅक्टरचलीत कपाशी पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करण्यात आली सदर पेरणी प्रात्याक्षीक दरम्यान कृषी विज्ञान
केंद्र यवतमाळ चे रविंद्र राठोड , प्राची नागोसे , राशी कंपनीचे अंकुल गेडाम सर , तेजस आंबेकर, शुभम बिटे जिवनविकास कल्टिव्हेटर्स प्रोड्युसर कंपनी राळेगावचे बालाजी कदम, भाग्यश्री पाटील व सदर शेतकरी उपस्थित होते या तंत्रज्ञाना बाबत राशी सिडस प्रा.लि.चे प्रतिनिधी अंकुल गेडाम सर , जिवनविकास कल्टिव्हेटर्स प्रोड्युसर कंपनी राळेगाव चे बालाजी कदम व कृषी विज्ञान
केंद्र यवतमाळ चे रविंद्र राठोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलीत कपाशी पेरणी यंञा बाबत मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी सुरेश वर्मा, पराग इंगोले ,अभिषेक इंगोले विजय पाटील यांच्या सह गावातील शेतकरी उपस्थित होते. सदर वर्षी या पध्दतीने जास्तीत- जास्त एकर वर लागवड होईल असा विश्वास संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे