
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे नेते स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती आज दिनांक 1/7/2024 रोज सोमवारला बंजारा कर्मचारी संघटना राळेगाव तालुका यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम संघटनेचे अध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी ताराचंद पवार यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याच शुभ दिवशी संघटनेचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात कार्यरत रूपेश जाधव यांचा वाढदिवस असल्याने केक कापून व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रतिभा आश्रम शाळेचे प्राथमिक विभाग जळकाचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण सर, एल.एम.बी. शाळा झाडगावचे जेष्ठ शिक्षक शिवा जाधव सर, प्राध्यापक निखिल आडे सर, पोलिस विभागात कार्यरत रूपेश जाधव, निलेश पवार पोलिस,श्रावनसिंग वडते सर, सौरभ वडते, सौरभ चव्हाण,गौरव चव्हाण,गिता वडते,दिव्या राठोड, सर्वेश राठोड राळेगावकर,ऋषी जाधव,शितल जाधव,दर्शना आडे, वैशाली ताराचंद पवार, प्रेमिला चव्हाण, सपना पवार ,पायल जाधव,यांच्या सह अनेक बंजारा कर्मचारी संघटनेचे परिवार बंधू भगिनी उपस्थित होते.
