अज्ञात वाहनाची चारचाकी वाहनाला धडक

सहसंपादक: रामभाऊ भोयर

       

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एका भरधाव वाहनाने उभ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली.या अपघातात अपघात ग्रस्त चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हि घटना १७ डिसेंबर रोजी दुपारी घडली.
नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील देवधरी ते किन्ही दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ एम.एच.३२ ए.एच.००४५ क्रमांकाची होंडा कंपनीची चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला उभे होते.दरम्यान मागाहून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने सदर वाहनाला जोरदार धडक दिली.या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी त्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या प्रकरणी वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.