नेताजी विद्यालय राळेगावचा तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक”

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

दि 06/08/2022 रोजी न्यू इंग्लिश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये वर्ग 6 ते 8 गटामधून नेताजी विद्यालय राळेगाव ने प्रथम क्रमांक पटकावला. वर्ग 8 वी चे विद्यार्थी साहिल झोडे आणि सुजल नवघरे यांनी पाण्याची पातळी वाढली असता सूचना देणारे यंत्र तयार केले होते, या यंत्रामुळे पाण्याची बचत होईल तसेच जीवित हानी कशी टळतील याची माहिती उपस्थितांना प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण करून पटवून दिली,हे यंत्र आपण आपल्या घरी अतिशय कमी खर्चात व कमी वेळेत कशे तयार करता येते हे सुद्धा पटवून दिले प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हा स्तरीय प्रदर्शनी साठी शुभेच्छा दिल्या.