हिंगणघाट शहरातील युवा, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू परवेज बेग उर्फ पाशू यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्ष प्रवेश


प्रमोद जुमडे/हिंगणघाट

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरातील युवा, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू परवेज बेग उर्फ पाशूभाई, करीम खान, मलक नईम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला.
सदर पक्ष प्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद अली अजानी, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन आज दि.२८ जून २०२४ रोजी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी शहरात युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू परवेज बेग उर्फ पाशू यांच्यासह साजीद हुसेन अजानी, मोहम्मद रझा अजानी, आसिफ मलनस, हर्षु भाई, इक्कु शेख, मूनाफ शेख, याकूब खान, आरिफ खान, योनुस भाई, बबलू गाडगे, जिवन कांबले, सैयद अफझल, शेख, असिफ, शेख फातिम, साजीद पटेल, शेंख चांद, वासिम शेख, नईम शेख, नदीम अब्दुल रिझवान शेख, रोहित बैसवारे, तणवीर खान, शुभम नैताम, फातिम शेख, शेख माकीम, कलीम शेख, शेख निसार, अझहर शेख, मिर्झा शरीब बेग, तालिब शेख, नेहल अन्सारी, शैझान शेख, रेहान खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळेस सर्वाचे पक्षाचा दुप्पटा देऊन व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा,बालू वानखेडे, नदीमभाई, अमोल बोरकर, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, अनिल लांबट, सुनील भुते, गजू महाकाळकर, विष्णु कारमोरे, पंकज भट्ट, सुशील घोडे, अन्सार शेख, मोहम्मद शाहीद, राहुल जाधव आदी उपस्थित होते…