
बांगलादेशामध्ये हिंदू लोकांवर अत्याचार, मंदिरवर हमले, हिंदू लोकांची हत्या होत आहे. तेथील कायदा व सुव्यवस्था आणि सरकार डगमगली आहे. आम्ही सकल हिंदू आशा करतो की, भारत सरकार या सर्व घटनाचे प्रति जागृत आहे. बांगला देशात आंदोलन करणाऱ्यांमध्ये मोठा हिस्सा भारत देशा विरोधी असलेल्या समुदायाचा आहे. ज्यामध्ये इस्लामिक आतंकवादी संघटन ची प्रमुख भूमिका आहे.
भारत सरकार तुरंत बांगलादेशाच्या सेना प्रमुख सोबत चर्चा करून बांगलादेशा मधील हिंदू लोकांची सुरक्षा करेल. आणि यासाठी आवश्यकते नुसार बांगलादेशाला कडक शब्दात चेतावणी देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशातील हिंदू लोकांची रक्षा करा. असे निवेदनात नमूद केले असून सकल हिंदू संघटनानी तहसीलदार मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांना निवेदन पाठविले आहे.
या आंदोलनामध्ये हेतूपूरस्पर निशाणा बनवून जाग्या -जाग्यावर हिंदू लोकांवर हमले, घरांची लुटपाट, घराची जाळपोळ, मंदिराची तोडफोड, मूर्तिना तोडणे, ठाणे तोडणे, आणि हिंदू ची हत्या सत्र सुरु आहे. हिंदू भावा -बहिणीवर अत्याचार च्या बातम्या येत आहे.
सकल हिंदू वरोरा ची मागणी आहे की, बांगलादेशांतील हिंदू ची सुरक्षा करा. आणि बांगलादेशातील हिंदू चे संरक्षण करण्यासाठी नियंत्रण करणारे सेना प्रमुख यांना भारत सरकार कडून चर्चा झाली पाहिजे. आवश्यकता पडल्यास भारत सरकारने आपली सेना बांगलादेशांत पाठवून अखंड भारत निर्माण करा. बांगलादेशातील हिंदू लोकांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकार बांगलादेशातील सेना प्रमुखांशी चर्चा करुन हिंदू नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने चेतावणी द्यावी. असे निवेदनात नमूद केले आहेत.
सकल हिंदू नी वरोरा शहरातून दुचाकीवर मुख्य मार्गांवरून रॅली काढली. शहरातील दुकानें आणि शिक्षण संस्था बंद होत्या.
