फुलसावंगी च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव, एका वर्षात 225 प्रसूती करून जिल्ह्यात ठरले प्रथम

उत्कृष्ट कामगिरी बद्दल पालक मंत्र्याच्या हस्ते सन्मान

जुना वैभव मिळून देण्यात डॉ सल्लावार यांना यश

प्रतिनिधी फुलसावंगी – संजय जाधव


आरोग्य विभागात दर वर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात त्यांच्या कामाना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गौरव केला जातो. या मध्ये या वर्षी सण 23-24 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूती केल्या बद्दल फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचें वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विठ्ठल सल्लावार यांचा स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आहें
प्रसुती चा विषय अतिशय खर्चिक झालेला आहे. विशेषत ग्रामीण भागात हा प्रश्न जिवा वर बेताव इतका गंभीर प्रश्न आहे. फुलसावंगी परिसरातील महिला रुग्ण पुसद, उमरखेड येथील खासगी दवाखान्याचे पर्याय आहेत. आणि खासगी दवाखान्यात सिजर करण्याचा जास्त भर दिला जातो हा खर्च पन्नास हजाराच्या ही वर जाते अशा परिस्थिती त फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महिलांसाठी एक आधार बनून समोर आला आहे. येथे वार्षिक 300 ते 400 प्रसूत्या होत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूती साठी दिला जाणारा डॉ आनंदी बाई जोशी हा पुरस्कार 2017 साली फुलसावंगी आरोग्य केंद्राला देण्यात आला होता तर 2023-24 साली जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे.ही सेवा अविरत सुरु आहे.2017 नंतर चा बराच काळ हा फुलसावंगी प्रा.आ.केंद्रा साठी काही सेवा मध्ये पिछाडीवर पडला होता. मात्र डॉ विठ्ठल सल्लावार हें फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रा कडे सामान्य रुग्णांचा कल वळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी सण 2023 -24 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक अशा 225 प्रसुत्या केल्या आहेत.
त्यांच्या या कामाची दखल घेउन जिल्हा प्रशासनाच्या वतीने यवतमाळ येथे पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यांमध्ये डॉ विठ्ठल सल्लावार यांचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन कामाचा गुण गौरव करण्यात आला आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

फुलसावंगी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीचे भिजत घोंगडे

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमे वर असलेल्या फुलसावंगी येथे दररोज जवळपास च्या चाळीस पेक्षा जास्त गावांच्या नागरिकांचा संपर्क येतो. या अनुषंगाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील रुग्णांची संख्या लक्षनीय आहे. रुग्णांच्या मनाने येथील सुविधा अपुऱ्या पडतात त्या मुळे फुलसावंगी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागील अनेक वर्षाची मागणी आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने व मागणी रेटण्यासाठी स्थानिक नेते मंडळी कमी पडली ज्या मुळे फुलसावंगी येथे ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे कायम आहे.

सू सज्ज प्रसूती ग्रहाची गरज –

या ठिकाणी एकाच वेळी दोन- दोन, तीन तीन रुग्ण डिलेव्हरी साठी आलेल्या असतात.मात्र येथे एकच डिलेव्हरी करण्याची सुविधा आहे. अशा वेळी रुग्णांना वाट पाहावी लागते व डाक्टरांची सुद्धा गोची होते.म्हणून या ठिकाणी सुसज्ज अशा प्रसूती ग्रहाची नितांत गरज आहे.