किरण कुमरे यांची काँग्रेस कडे उमेदवारी ची मागणी
[ शासनाने आदिवासी सेवक म्हणून केला सन्मान ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

  

राळेगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस ची दावेदारी भक्कम मानण्यात येते. उमेदवारी बाबत मात्र राजकीय वर्तुळात विविध मतप्रवाह आहे, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नवा चेहरा देण्याची मागणी करतांना दिसतात. मतदार संघात सातत्याने कार्यरत असणारा, काँग्रेस पक्षाशी जुळलेला उमेदवार हा निकष लावण्यात यावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे. या निकषावर किरण कुमरे यांचे नाव आघाडीवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आता जोर धरू लागली आहे.
कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, कापसावर प्रक्रिया उद्योग या आघाडीवर मतदार संघात कोणतेही ठोस काम झालेले नाही. बेरोजगारीचा प्रश्न या मतदार संघात बिकट बनला आहे. या करीता सर्वांना सोबत घेऊन चालणारा नवीन उमेदवार असावा ही अपेक्षा गैर नाही.आदिवासी विकास परिषद दिल्ली या संघटनेचे जिल्हा महासचिव म्हणून उल्लेखनीय काम केल्याचा अनुभव किरण कुमरे यांच्या गाठीशी आहे. या अंतर्गत विविध आंदोलन, मोर्चा, प्रबोधन व समाज जागृतीचे काम त्यांनी केले.दरवर्षी आदिवासी समाजातील सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनाठाई खर्च टाळून जनजागृती चे मोठे काम त्यांच्या वतीने करण्यात येते. शासनाच्या विविध योजनाचा लाभ व्हावा या करीता त्यांनी आज पर्यंत विविध कामे केलेली आहेत. होतकरू विध्यार्थीना मदत करण्याचा प्रयत्न ते आजवर करत आले. 17 वर्ष शिक्षकी पेक्षात सेवा दिल्याने सर्व स्तरात त्यांच्या प्रती आदराची भावना आहे. या जमेच्या बाजू असल्याने काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी त्यानी केली. त्याची वरिष्ट पातळीवरील नेतृत्वाने दखल घेतली. सामान्य माणूस देखील त्यांच्या उमेदवारी करीता सकारात्मक असल्याची भावना व्यक्त करतो.
राजकीय क्षेत्रात देखील सर्व नेत्यांमध्ये चांगले समंध स्वतः चा शालिन स्वभाव व सेवावृत्तीमुळे त्यांनी निर्माण केले.महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने याची दखल घेतली व आदिवासी सेवक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
काँग्रेस ची विचारधारा ही सर्वसमावेशक विचारधारा आहे . सर्व धर्म, सर्व जाती संप्रदाय यांना सोबत घेऊन चालणारा विचार रुजवणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस मध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक असली तरी स्थानिक पातळीवर गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणे, काँग्रेस सोबत एकनिष्ठ असणे या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात. सर्वांना चालणारा एक आश्वासक चेहरा,काम करणारा माणूस या निकषावर त्यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होतांना दिसते.