कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक:सुधीर भाऊ जवादे कर्तव्यदक्ष सरपंच

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

कीन्ही जवादे ता राळेगाव जिल्हा यवतमाळ
सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासन कटिबद्ध आहे.ग्रामीण भागातील गावखेड्यात आरोग्याच्या समस्या आहे, शासनाच्या सुविधा नसल्याने मीळेल त्यांचेकडून उपचार घ्यावे लागतात.
कीन्ही जवादे हे गाव राष्ट्रीय महामार्ग 44 लगत असुन विहीर गाव ,खैरगांवजवादे,ऐकुर्ली, धुमका,चाचोरा. ,गाडेघाट,देवधरी,बोरी ईचोड,वडकी सावित्री पिंपरी,मंगी या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.कीन्ही जवादे येथे मोठा पेट्रोहब होत असुन , त्यापैकी तिनं पेट्रोल पंप सुरू झाले आहे,33के.व्ही चे विद्युत उपकेंद्र होत असुन, आदिवासी सुतगीरणी प्रस्तावित आहे.परिसरातिल आदिवासी बहुल गावातील कीन्ही जवादे हे मध्यवर्ती गांव असुन विकसनशील आहे, आमदार खासदार,जी प सदस्य यांची परंपरा, राजकीय वारसा असलेले गाव आहे.
कीन्ही जवादे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असुन त्यासाठी ग्रामसभेत ठराव संमत केला आहे,व मा.पालकमंत्री यांचे कडे रितसर अर्ज केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जवादे परीवाराने घेतली आहे.