हिमायतनगर रेल्वेगेट ते परमेश्वर मंदिर कमान अंतर्गत रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी एक तास रास्ता रोको आंदोलन


हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

राष्ट्रीय महा मार्गाच्या प्रलंबित कामासाठी जनता आक्रमक झाली असून वैतागलेल्या प्रवाशी जनतेने आता रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले असून नियोजित केल्या प्रमाणे
ता. १ बुधवारी परमेश्वर मंदिर कमानी समोर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात तालूक्यातील जनतेने मोठा सहभाग नोंदविला होता. या वेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. व तसेच प्रशासन व संबंधित विभाग,
लोक प्रतिनिधी यांच्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली.
तालूका दंडाधिकार्यामार्फत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

भोकर ते वणी या अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करून या अंतर्गत रस्त्यासाठी केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यावधी रूपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. भोकर कडून कामाची सुरुवात चांगल्या प्रकारे होवून हिमायतनगर नवीन दारूलूम पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिट पुर्ण झाले. सदरचे काम हे शारदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पुर्ण होवून जवळपास पाच वर्ष होत आहेत.
तेव्हापासून हिमायतनगर दारलुम ते इस्लापूर ,किनवट महामार्गावरील काम अतिशय कासव गतीने चालू असून रेल्वेगेट ते परमेश्वर मंदिर कमान अंतर्गत रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला आहे.
या अंतर्गत रस्त्यावर धुळीचे लोट पसरत आहेत. बारीक गिट्टी अंथरून ठेवल्याने घसरगुंडी होवून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. सदर कामाचे ठेकेदार हे गेंडयाची कातडी ओढवून बसले असून जनतेचे मात्र मोठे हाल होत आहेत. या भागाचे लोकप्रतिनिधी ही या बाबींकडे लक्ष घालायला तयार नाहीत. आता प्रवाशी जनता वैतागून गेली आहे. सदर ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत टाकून त्याचेवर कारवाईचा बडगा उगारावा.
अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे. या वेळी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.