
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अर्तगत प्रत्येक अंगणवाडी केन्द्र स्थरावर सप्टेंबर २०२४ पोषण माह म्हणून साजरा करण्यात आला, त्याअनुषंगाने दिनांक ३० सप्टेंबर २०२४रोजी वरध येथे वरध बिटस्तरीय पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर हे होते, तसेच प्रमुख उपस्थितीत श्रीमती तारा डोफे, वंदना गेडाम,योगीता बावने, सुनिता तांगडे,शिला नगराळे ह्या मंचावर उपस्थित होत्या.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, यावेळी आहार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आहार, आरोग्य, स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका ममता गजबे, संगीता मोहोद, व अर्चना जांभुळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध स्पर्धा, रांगोळी, तसेच विविध प्रकारची बडबडगीते सादर करण्यात आली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना बुध्देवार, प्रास्ताविक प्रणाली बोदाडे व आभार आम्रपाली खोब्रागडे, यांनी मानले, यावेळी कांताबाई झुंझुरकर, मनोरमा कोवे, मिनाक्षी चिडाम, पौर्णिमा बोदाडे, मुक्ता नेहारे, महानंदा लढी, जनाबाई परचाके, ललीता मानगी, कोमल कन्नाके, सुनंदा शिंदे, हेमलता मेश्राम,राधा टेकाम, चेतना मेटकर, सुनिता दारूंडे, कोमल किन्नाके, किरण अंजिकर, प्रभावती आत्राम,प्रणाली मेश्राम,प्रमिला तोडासे उपस्थित होत्या.सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ,मदतनीस यांनी खुप परिश्रम घेतले.
