उबाठा सेनेकरीता डॉ. उत्तमदादा राठोड उमेदवार का?

सहसंपादक :रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, नेर, मतदारसंघाला बंजारा बहुल मतदार संघ म्हणून ओळख आहे. अॅड. डॉ. उत्तमदादा राठोड हे या समाजातील प्रतिष्ठित नाव असून त्यांनी दिग्रस या मतदार संघांमध्ये मागील 20 वषार्पासून राठोड हॉस्पिटलच्या सहकाऱ्याने अहोरात्र करून गरीब, गरजू, भूमिहीन, दारिद्र रेषेखालील रुग्णांची मोफत सेवा केली. अद्यापही करीत आहे. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण एमडी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर एलएलबी हे अमोलकचंद विधी महाविद्यालय यवतमाळ येथून पूर्ण केले आहे.

मागील बऱ्याच वषार्पासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत असून शिव आरोग्य सेने तर्फे पश्चिम विदर्भ अध्यक्ष असून, पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सुद्धा ते एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते कार्य करत आहे. त्यांनी पक्षांमध्ये अनेक कार्यकर्ते जोडले असून कोरोना काळामध्ये त्यांचे कार्य तर अतुलनीय आहे. त्यांनी १०८ गावे दत्तक घेऊन गरीब, गरजू, भूमिहीन, दारिद्यरेषेखालील रुग्णांना एक वर्ष मोफत आरोग्यसेवा पुरविली आहे. गावोगावी, खेडोपाडी जाऊन त्यांनी अर्सनिक अल्बम हे कोरोना काळातील प्रभावी औषध त्यांनी मोफत शिबिरे लावून, खेडोपाडी , दारोदारी जाऊन दिले आहे. बंजारा समाजाशी निगडित असल्याने ते बंजारा समाजाची जवळपास ८० टक्के मतपरिवर्तन करण्यास सक्षम आहे. व इतर समाजाचे ही सुद्धा त्यांना फार मोठे सहकार्य व प्रेम मिळाले याच मुळीच शंका नाही ते नेहमी सर्वधर्मसमभावाने वागत असून रंजल्या, गांजल्यांची सेवा ते अहोरात्र दिवस करीत असतात. सामाजिक कार्यात ते फार अग्रेसर असून आत्तापर्यंत त्यांनी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिरे जवळपास अडीचशे त्यांनी समाजाकरिता सर्वांकरिता घेतलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव आरोग्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कृत डॉक्टर असून त्यांनी गायत्री फाउंडेशनची स्थापना केली व गायत्री फाउंडेशनच्या माध्यमाने असंख्य सामाजिक व राजकीय उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबविलेले आहे. डॉ. उत्तमदादा राठोड हे विमुक्त, घूमतू जनजाती महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून जवळपास ५६० जाती पोटजातीचे ते प्रतिनिधित्व करतात. याचाही फायदा निश्चितच पक्षाला व त्यांना होणार आहे. डॉ. उत्तमदादा राठोड यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची उमेदवारी मिळाल्यास गेम चेंजर म्हणून साबित होईल डॉ. उत्तमदादा राठोड हे उच्च शिक्षा विभूषित असून वैद्यकीय तज्ञ तथा विधी तज्ञ आहे. याचा जनसामान्यांना फार मोठा फायदा होणार आहे. समाजातील एक नवीन परिवर्तनशील चेहरा म्हणून आपल्याला मिळेल. अशी चर्चा जनसामान्य मतदारसंघांमध्ये चालू आहे. लोकसभेमध्ये सुद्धा खासदार संजय देशमुख यांना निवडून आणण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता खेडोपाडी भेटी चालू असून यामध्ये मतदार संघामध्ये त्यांना उत्तरस्कृत प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे व लोकसभेमध्ये सुद्धा माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यांना निवडून आणण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे