
प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्व युवकांचे शाल श्रीफळ देऊन केले स्वागत…
हिंगणघाट;- समुद्रपूर येथील युवकांनी अतुल वांदिले आमदार व्हावेत, यासाठी डोंगरगड येथे पायी जाऊन माँ बमलेश्वरी देवीच्या चरणी साकडे घातले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्व युवकांचे शाल आणि श्रीफळ देऊन आदरपूर्वक स्वागत केले. या कार्यक्रमात युवकांनी अतुलभाऊंच्या नेतृत्वाची प्रशंसा करत, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न साकार व्हावे, अशी भावना व्यक्त केली…
समुद्रपूर परिसरातील ११ युवकांनी समुद्रपूर ते डोगरगड पायी जाऊन अतुल वांदिले आमदार व्हावे अशी माँ बमलेश्वरी चरणी साकडे घातले.
प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक कार्यालयात सर्व युवकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी नितेश कोल्हे, शशिकांत वझे, कैलास मानकर, अमित वझे, दिपक गिरुले, रोहन देवतळे, मुन्ना डंभारे, अनिकेत वेले,विशाल चौधरी, मोरेश्वर वाघमारे, अविनाश तुमडाम यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी हिंगणघाट शहर बूथ अध्यक्ष सुनील भुते, समुद्रपूर शहर अध्यक्ष शक्ती गेडाम,वैभव साठोने, राहुल जाधव, राजू मुडे उपस्थित होते..
