अपघातास निमंत्रण ठरणारा धोकादायक पोल अखेर हटवला [ नगरसेवक मंगेश राऊत व नागरीकांच्या प्रयत्नाला यश ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

   

राळेगाव शहरातील प्रभाग क्र. 8 मातानगर येथे वर्दळी च्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा पोल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येतं होत्या. नगरसेवक मंगेश राऊत व प्रभागातील नागरिकांच्या यांच्या प्रयत्नाने हा पोल काल ( दि. 28) हटवण्यात आला.
राळेगाव महावितरणचे सहाय्यक अभियंता जे. एस.ढुमणे व त्यांच्या टीम ने प्रभागातील नगरसेवक तथा नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देतं पोल हटवण्यास सहकार्य केले. विशेष म्हणजे या ठिकाणावरून स्कुल बस, खाजगी वाहने, मोटरसायकल यांची ये-जा नित्याची होती. हा पोल रस्त्याच्या मधात असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. पंधरा वर्षा पासून हा पोल हटवण्याची मागणी नागरिक करीत होते.
यावेळी स. अभियंता जे. एस.ढुमणे , नगरसेवक मंगेश अ. राऊत, संजय दुरबुडे, जीवन रामगडे, दिगांबर बातुलवार , किशोर खडसे , बबनराव नगराळे,प्रदिप महल्ले ,नितीन कोमेजवार आदी सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.