दहेगाव येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आदिवासी समाजाचे दैवत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली, मान्यवरांच्या हस्ते झेंडा पुजन व शिवाजी चौक मध्ये असलेल्या, क्रांतीसुर्य भगवान बिरसा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण करण्यात आले व सर्व आदिवासी समाज बांधवांनी पुजन केले घोषणा देण्यात आल्या नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमांची सागता करण्यात आली व कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुशिल आत्राम यांनी केले व सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद शाळा पासून गावातील प्रमुख मार्गावरून शिवाजी चौक पर्यंत ढोल व ताशांच्या नादात नाचत गाजत मोठ्या प्रमाणात भव्य रॅली काढण्यात आली सेवावृत्ती मुख्याध्यापक, रामदासजी परचाके, शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव, रविंद्र येरमे अध्यक्ष बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती, पद्माकर जुमनाके, पुंडलिक मेश्राम, जयपाल पेदोंर, गणेश जुमनाके, रोशन मेश्राम, गोलु मडावी,आकाश परचाके, सुरज सलाम, ज्ञानेश्वर मडावी,अजय जुमनाके, विनोद कुळसंगे ,लिना जुमनाके, ज्योत्स्ना मडावी, सोनाली बोरीकर, तथा दहेगाव गावचे पुरूष महीला आदिवासी समाज बांधव व गावातील नागरिक उपस्थित होते