स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाचा विकास होतो खासदार संजय देशमुख

सहसंपादक : रामभाऊ भोयर

स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनातील पर्वणी असते स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलांना वाव मिळतो स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण वाढीस लागते असे विचार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी राळेगाव येथे व्यक्त केले न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला यावेळी उद्घाटक म्हणून खासदार संजय देशमुख बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बीके धर्मे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तसा उपविभागीय अधिकारी विशाल खत्री न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ अर्चना धर्मे गटविकास अधिकारी केशव पवार विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक अरविंद वाढोणकर विनोद काकडे विनय मुनोत सचिन धर्म स्वप्नील धर्मे आधी उपस्थित होते उपस्थित यांना मार्गदर्शन करताना संजय देशमुख पुढे म्हणाले की मी अंगणवाडी दत्तक घेत आहोत खासदार निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी हा शिक्षण क्षेत्राला देण्याचा माझा मानस आहे शिक्षण क्षेत्रात निधी मागताना नागरिक दिसत नाही पण मी शिक्षण क्षेत्राला माझ्या खासदारकीचा भरीव निधी देण्याचा निश्चित प्रयत्न करेन यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलन एन्जॉय करायला सांगितले जीवनात अशक्य असं काहीच नाही प्रयत्न केले तर निश्चितच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील आय ए एस आय पी एस आय आर एस अधिकारी निश्चितच होतील यावेळी गटविकास अधिकारी केशव पवार यांनी सुद्धा आपले विचार मांडले यावेळी संस्थेचे माजी शिक्षक बन्सीलालजी मुनोत यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी प्रास्ताविक प्राचार्य विजय कचरे यांनी आभार प्रदर्शन उपप्राचार्य सुरेश कोवे यांनी केले