

वरोरा:– वरोरा तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात अनेक अवैध दारु विक्रेते झालेले आहे.या अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाही करण्याची मागणी उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षकाकडे जामगाव येथील अहिल्याबाई होळकर महिला बचत गटाच्या महिला यांनी केली आहे.
जामगाव (बु) गावाच्या वेशीवर, गावात अनेक दारु विक्रेते अवैध रित्या दारूचा व्यवसाय वाढीस लागलेला आहे आहे. त्यामुळे गावात विपरीत परिणाम घडत आहे, गावातील आणि नागरिक या दारूच्या आहारी गेल्याने कित्येक स्त्रियांचे संसार उध्वस्त झाले आहे. गावातील युवक या आहारी गेल्याने गावात असंतोष, तंटे वाढले आहे. दारूबंदी कायदा 1949अधिनियम 65(इ) नुसार 3वर्षाची शिक्षा, 25हजार रु. दंड अशी तरतूद आहे. होनाजी लटारी करडभुजे, वर्षा होनाजी करडभुजे, समीर कर्डभुजे, हे सर्व जगन्नाथ बाबा मंदिराच्या मागे गेल्या अनेक महिन्यापासून अवैध दारु चा व्यवसाय करीत आहे. या व्यक्तींवर तरी कारवाई करून यांना तडीपार करण्यात यावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, या संदर्भात उपाय विभागीय पोलीस अधिकारी यांना अनेकदा निवेदन देऊनही या विरोधात कोणतीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष, त्यामुळे सदर व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक यांच्याकडे मिरा सूरेश भोगेकर, शालू नरेश भोगेकर, शारदा मारोती पिंपलशेंदे, मंगला रवींद्र चिडे, मंजुषा प्रमोद नीखडे, वंदना दिलीप भोगेकर यांनी निवेदनातून केली आहे, या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार वरोरा, पोलीस निरीक्षक वरोरा यांना देण्यात आले आहे.
