मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. निंगनूर ते नागेसवाडी झालेल्या रस्त्याचे डागडुगीचे काम बोगस


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील रस्त्याचे काम दि 16/06/2017कार्यारंभ झाले होते व तसेंच दि.15/06/2018रोजी पुर्णत्वा झाले या नागेशवाडी रस्त्याचे 2.00किलोमीटर कामाची निधी तसेंच किमान रु.11996लक्ष एवढी किंमत आहे. 5वर्षा देखभाल व दुरुस्ती साठी किमान रु.8.39लक्ष एवढा निधी आहे पण कंत्राददाराने राहिलेल्या निधीसाठी आता रस्त्याचे डागडुगीचे काम केले होते पण ते काम बोगस करण्यात आले आहे असें नागेशवाडी गावातील नागरिकांकडुन ऐकायला मिळत आहे. कार्यकारी अभियंता (मुख्यमंत्री ग्रा. रा. यो )महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ महाराष्ट्र शासन यानी प्रत्यक्ष पाहणी करूनचं समोरील निधी उपलब्ध करून देणे अशी मागणी नागेशवाडी येथील नागरिकांकडून होत आहे.