
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव नगर पंचायत हद्दीत मृत श्वानांची विल्हेवाट रावेरी रोडने लावला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रावेरी, पिंपलखुटी आणि वरूड येथील नागरिकांना नेहमी बाजार पेठ राळेगाव असल्याने आपल्या उदर निर्वाहाच्या गरजा भगविण्यासाठी राळेगाव येथे येत असताना मृत श्वान रोडवर आणून टाकल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रावेरी गाव हे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असून, येथे देशातील एकमेव सीता मंदिर आहे. दररोज येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असतात. परंतु रावेरी रोडने मृत श्वानांची विल्हेवाट लावल्यामुळे येथील वातावरण दूषित झाले असून, रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
मृत श्वानांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राळेगाव नगर पंचायतीवर आहे. स्थानिक नागरिकांनी नगर पंचायतीने याकडे विशेष लक्ष देऊन त्वरित योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.
रावेरी, पिंपलखुटी आणि वरूड येथील नागरिकांनी राळेगाव नगर पंचायतीने या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. तसेच, धार्मिक स्थळांच्या आसपास स्वच्छता आणि स्वच्छ हवेचा अनुभव मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.