
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासनाच्या वतीने शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने राळेगाव येथे तालुका स्तरावरील वेगवेगळ्या वयोगटातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मैदानावर दिनांक 21/8/2024 रोजी खो खो च्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये श्री लखाजी महाराज विद्यालय झाडगाव यांनी दरवर्षी कुठल्या तरी तालुका विजेत्याची परंपरा कायम ठेवत सतरा वर्षे वयोगटातील खो खो या खेळाचे तालुका विजेते पद स्कूल ऑफ ब्रिलियंटला पराभूत करून पहिला क्रमांक पटकावून शाळेचे नावलौकिक केले आहे त्या मध्ये समिक्षा ठाकरे,शिवानी पवार, प्रांजली शेंदरे , स्नेहल वडते, श्रुती शिवरकर,जयश्री आडे, वैभवी सोनटक्के,श्रुती चहारे, समिक्षा खैरी, रूपाली गेडाम, लक्ष्मी मरस्सकोल्हे,अणू नेहारे
या खेळाडूंनी आपला खेळ दाखवून प्रेक्षकांना मोहित केले.त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शक तथा कोच म्हणून शारीरिक शिक्षक मोहन बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले हा संघ विजेता पद पटकावून शाळेत परतला त्यावेळी शाळेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे, उपाध्यक्ष आशिष कोल्हे यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकासह अनेक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या विजयाबद्दल संचालक मंडळ व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
