
शेतकऱ्याना सिंचना करीता नवीन डी.पी व विद्युत पोल उपलब्ध करून द्यावे.
स्मशानभूमी सुशोभीकरणा करीता निधी मंजूर करून द्यावा.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.श्री.संजय भाऊ देशमुख यांची दिग्रस येथील निवास्थानी भेट घेऊन राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथील अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमी सुशोभीकरना करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावा करीता ग्राम पंचायत ठरावासह निवेदन देण्यात आले व महावितरण मार्फत शेतकऱ्यांना सिंचना करीता नवीन रोहित्र (डी.पी) तसेच गावातील नवीन वस्ती मद्ये विद्युत पोल तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे या संदर्भात खासदार साहेबांचे पत्र घेण्यात आले व ग्रामीण भागातील विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी करंजी ( सो ) येथील युवा सरपंच मा.प्रसाद ठाकरे,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.संजय शेडमाके,सामाजिक कार्यकर्ते संजय भोयर,रितेश दांडेकर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तेजस ठाकरे उपस्थित होते..!
