
वरोरा
गुरुदेव सेवा मंडळ, भटाळी च्यां वतीने दि.28फेब्रुवारी ला सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तन, प्रवचनाचा कार्यक्रम भटाळी येथील ग्रामपंचायतीच्या मोठया प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सेवा सहकारी सोसायटी लोकार्पण, शुद्धीकरण यंत्राचे अनावरण, राष्ट्रीय तुकडोजी महाराज मूर्तीचे उद्घाटन, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण अशा अनेक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध खंजरी वादक सत्यपाल महाराज भटाळी येथे कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. कार्यक्रम आयोजन कमिटीचे अध्यक्ष, सुधाकर रोहनकर होते . प्रमुख अतिथी सरपंच शंकर रासेकर, सागरा. राजेंद्रजी ताजने, सामाजिक कार्यकर्ता, तंटामुक्ती अध्यक्ष, विलास सातपुते, धनराज विरुटकर, झाडे सर, मेश्राम सर हे उपस्थित होते.
‘हमेशा हमारा नफा ही नफा है’ या कडव्याद्वारे ह. भ. प सत्यपाल महाराज यांनी नागरिकांना संताच्या विचाराचा मार्ग असून तो आत्मसात करा समाजातील व्यसणाच्या आहारी गेलेल्या लोकांना दारू कशी घातक आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावरून चालताना पोलिसांवरच अवलंबून न राहता त्यांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे कसे गरजेचे आहे,हे सांगितले.
ग्रामगीता ही माणूस घडविण्याची मशीन असून ती
आत्मसात करा त्याचे अनुकरण करा असे उदात्त विचार त्यांनीआपल्या कीर्तनातून सकल समाजाला संबोधन करतानी सांगितले. आपल्या प्रवचनात छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, गाडगे महाराज, भीमराव आंबेडकर , अहिल्याबाई होळकर , सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या विचारांची सांगड सकळ समाजालाही घातली. कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांनी गावातील रक्तदान करणाऱ्या महिलेचा, दारूमुळे संसार नष्ट झालेल्या विधवा महिलांना साडी चोळी च्या रूपात दान दिले. लहान मुला मुलींना ग्रामगीता वितरित करण्यात आली. यावेळी सत्यपाल महाराज यांच्या प्रवचनाला भटाळी गावातील नागरिकांनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही या कीर्तन प्रवचनाचा आनंद उपभोगला.
एपीआय भस्मे यांच्या हस्ते सत्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित बोरगाव( ढोली ) येथील भस्मे कुटुंबांनी आपल्या शेतात तुकडोजी महाराजांचे भव्य मंदिर उभारले या कार्यक्रमाला भस्मे कुटुंबाची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ह भ प सत्यपाल महाराज यांना बोलविण्यात आले होते. मात्र कीर्तनाच्या प्रवचनाचा लाभ घेता आला नसल्याचे शल्य एपीआय शरद भस्मे यांना बेचैन करत होते. मात्र आज दि. 28 फेब्रुवारीला वरोरा तालुक्यात सेवारत असताना भटाळी येथे सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्यपाल महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भेटस्वरुपात राष्ट्रसंताचा फोटो देण्यात आला. सत्यपाल महाराज यांनी ग्रामगीता देऊन भस्मे यांचा सत्कार केला.
