ढाणकीत परतीच्या पावसाचा कहर ,आठरीच्या नाला ओव्हरफ्लो, तब्बल चार तास वाहतुक ठप्प


ढाणकी – प्रतिनिधी,प्रवीण जोशी


हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरवत परतीच्या पावसाने शनिवारच्या मध्यरात्रीपासून झोडपणे सुरू केले.ते रविवार दुपार पर्यंत पावसाचा सुरू होता कहर त्यामुळे आठरीचा नाला झाला ओव्हरफ्लो पुलावरूण अंदाजे 2 ते 3 फुट पुराचे पाणी वाहू लागल्याने तब्बल चार तास वाहतूक एैल पैल थडीवर ठप्प झाली.
मागील दोन दिवसांपासून ढाणकी परीसरात आपला मुक्काम ठोकत कुठेही रिप-रिप तर कुठे रिमझीम बरसणे सुरू ठेवले.15 दिवसाच्या उघडीप नंतर झालेल्या परतीच्या पावसाने जंगी स्वागत बळीराजाने केले.कारण तिव्र उन्हाच्या दाहकतेने पिकांना फटका बसत होता.त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ दिसू लागली.मात्र अचानक परतीच्या पावसाची चाहूल लागली आणि उन सावलीचा खेळ प्रमाणे पावसाने पिकांशी लपाछपी सुरू केली.तुरळक पडनाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आणि पिकांना नवसंजीवणी मिळाली परंतु शनीवारच्या रात्रपासून पावसाने कहर केला आणि आठरीचा नाला दोन्ही धडी वाहू लागला.रविवारी सकाळी 3 तास पडलेल्या पावसाने ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील पुलावरील पाणी वाहू लागले तिन तास प्रवाशाना ताटकळत पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली.रविवार असल्यामुळे शाळा बंद होत्या.विद्यार्थी व शिक्षकांची यातुन सुटका असली तरी दवाखाना व इतर कामांसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरीकांना तब्बल 3 तास पुलावरूण पाणी कमी होण्याची प्रतिक्षा करावी लागली.तर काही नागरीकांनी मुठीत जिव घेवून पुरातून वाट काढली.