सरकारचे पोषण आहाराचे खिचडीचे पुडे निकृष्ट दर्जाचे- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,सरकारची आणि मल्टी मिक्स कंपनीची साडगाठ

खराब कडधान्यामुळे उलटी, पोटदुखी,पातळ संडासाचे आजार.

महिलांनी घेतली माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट.

हिंगणघाट:- १३ जुन २०२४
महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गरोदर महिला यांना ०६ महिने ते ०३ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ‘मल्टी मिक्स सिरीयल्सअॅड प्रोटीन्स प्रिमीक्स’ कंपनी तर्फे मिळावट येणारे खिचडीचे पुडे निकृष्ट दर्जाचे असुन लहान मुलांच्या आरोग्याला बाधा होत आहे. त्यामुळे जुन्या पध्दतीने मिळणारे मुगाची दाळ, गहु,तांदुळ, चनादाळ, चना, तेल, साखर, हळद, मिठ, तिखट, मसुरची दाळ ईत्यादि चांगल्या प्रकारचे साहित्य सरकार तर्फे देण्याबाबतची समस्या घेऊन महिलांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व समस्या सांगितल्या असता माजी आमदार तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली व या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालून मल्टी मिक्स सिरीयल अँड प्रोटीन मिक्स कंपनी वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सोबत माजी नगरसेवक सौरभ तिमांडे,शकील अहमद उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) अंतर्गत गरोदर महिला ०६ महीने ते ०३ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले व फाययदेशिर राहण्यासाठी ‘मल्टी मिक्स सिरीयल्स ॲड प्रोटीन्स प्रिमीक्स’ कंपनी तर्फे मिळावट करुन मिळणारे खिचडीचे पुडे निकृष्ट दर्जाचे येत असुन लहान मुलांच्या आरोग्याला बाधा निर्माण होत आहे.
या पुड्यातील माल खराब असल्यामुळे गरोदर महिलांना कडधान्याचा कडसड वास येवुन पोटदुखीचा त्रास होत आहे. तसेच लहान मुलांना या खराब कडधान्यामुळे उलटयांचा, पोटदुखी,पातळ संडास अशा प्रकारचा त्रास होत असुन महाराष्ट्र मध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर समस्या एकट्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात होत नसून संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.याप्रकारे गरोदर महिला व लहान मुलांच्या आरोग्याशी “मल्टीमिक्स प्रोटीन कंपनी”खेळ करत असेल तर खिचडीचे पुडे निकृष्ट दर्जाचे पुरवणाऱ्या कंपनीवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यावेळी करण्यात आली. जर सरकार अशा कंपन्यांवर कारवाई करत नसेल तर सरकारची आणि या कंपनीची साडगाट आहे हे नक्कीच.
त्यामुळे जुन्या पुडयांच्या पध्दतीने मिळणारे मुगाची दाळ, गेहु, तांदुळ, चनादाळ, चना, तेल, साखर, हळद, मिठ, तिखट, मसुरची दाळ ईत्यादि साहित्याचा वाटप करण्यात यावे व गरोदर महिला व लहान मुलांच्या आरोग्याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह अंगणवाडीच्या निकृष्ट पोषण आहार मिळणा-या महिला नाजी शेख, कविता वानखेडे, काजल जीवने, निशा तामगाडगे, भाग्यश्री हेमंत पढरे,निशा तामगाडगे,काजल आदीत्य जिवने, शिवानी कनोजिया, संध्या मडावी,सागर धुल,संदिप भुईकर, वर्षा रणदिवे,वर्षा योगेश रणदिवे, मोनिका भगत,तनवीर शेख,निमा शंकर अंबाडरे,नलुताई शेळके,निकीता,भोराक,सपना मैंद,नंदनी तुमडाम,अश्विनी नाकतोडे ,खुशबु शेख,प्राची वाघे,प्रेमीला खंडाळकर शंकर अंबाडरे,योगेश रंगदीवे,निखील सुरसे,स्वप्नील वाघ,सपना मेहत,कुष्णात नाकतोडे,राहुल शेळके इत्यादि महिलांनी व पुरुषांनी केली आहे.