
सहसंपादक: रामभाऊ भोयर
समाजात लोकप्रिय असलेल्या व विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजक म्हणून नावलौकिक असलेल्या भोई गौरव मासिकाच्या वतीने रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुराम सभागृह, झाशी राणी चौक सीताबर्डी नागपूर येथे महाराष्ट्रातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व अधिकारी, पदाधिकारी यांचा कला गौरव करण्यात आला
या कार्यक्रमात घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेमध्ये सहभाग घेऊन घाटंजी शहराचा चेहरा-मोहरा बदलविला व घाटंजी शहराला जिल्ह्यात व देशात ऐतिहासिक दर्जा मिळवुन दिल्या बद्दल भोई गौरव मासिका तर्फे त्यांना “हिरकणी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिथे बोलताना माननीय मुख्याधिकारी राजू घोडके यांनी या पुरस्काराचे श्रेय संपूर्ण घाटंजीतील शहरवासीयांना दिल आहे. व जोपर्यंत घाटंजी नगर परिषदेला कार्यरत राहील तोपर्यंत शहरासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील व शहराच्या विकासासाठी झटत राहील असे आश्वासनही दिले.
त्याचसोबत युवा लेखक प्रमोद तुमाने यांच्या उत्कृष्ट लेखणीबद्दल व भोई गौरव मासिकाला तळागाळात पोहोचवण्याच उत्कृष्ट काम केल्याबद्दल व नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी सोहम गिनगुले या विद्यार्थ्यांने खुल्या गटातून जलतरण स्पर्धेत ब्रास मेडल व सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल तसेच द्रोपद कुरवाडे या विद्यार्थ्यांने JEE, NEET, MHCET उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल तसेच अनेक विद्यार्थ्यांचे व अधिकारी पदाधिकारी त्यांचे गुणगौरव व सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, दैनिक सकाळ निवासी संपादक प्रमोद काळबांडे, प्राध्यापक महेंद्र खेडकर, गोपाळ धारपवार, डॉक्टर श्रीकृष्ण ढाले, बाळू कावनपुरे, प्रमोद दिघोरे, राहुल हरसुळे, नंदू पडाल, राजाराम म्हात्रे प्रकाशजी लोणारे, व भोई गौरव मासिक चे मुख्य संपादक चंद्रकांतजी लोणारे तथा अनेक मान्यवर उपस्थित होते.
