वंचित बहुजन आघाडी राळेगांव यांनी एस. टी.आगारप्रमुख यांना दिले निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील चिखली येथील विद्यार्थी, पालक आणि वंचित बहुजन आघाडी राळेगांव यांनी वनोजा ते राळेगांव अशी ९.००वाजताचीबस सेवा विद्यार्थ्यांसाठी चालू करावि.९.००वाजता येणारी वडकी ते राळेगांव बस ही खचाखच भरून येत असल्याने चिखली, अंतरगाव व कोपरी या ठिकाणी बस
थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची नियमित शाळा होत नाही. बसपास असुन देखील हि पास दिखाव्यापुरती च राहिलेली आहे.
याआधी 11.8.2023रोजी महाविद्यालयीन निवेदने देण्यात आली आहे परंतु या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल आगार प्रमुखांनी घेतली नाही.


आगार प्रमुखांनी याबाबत येत्या चार पाच दिवसात तोडगा काढून लवकरात लवकर बससेवा चालू करावि.
व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावि.अन्यथा चिखली या ठिकाणी पालक, विदयार्थी व वंचित बहुजन आघाडी रास्ता रोको आंदोलन करेल . याला सर्वस्वी आपले एसटी महामंडळ जबाबदार राहिल. असे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते लोकेश भाऊ दिवे, वंचित बहुजन आघाडी चे राळेगांव विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश फुलमाळी साहेब,तालुका अध्यक्ष विकास भाऊ मुन, तालुका महासचिव प्रकाश भाऊ कळमकर, आणि विद्यार्थी उपस्थित होते.