
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात विजेचा प्रश्न चांगलाच गंभीर बनला आहे. या बाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येतं असल्याने मनसे च्या वतीने अल्टिमेटम देण्यात आला. काही दिवस विज वितरण विभाग कार्यप्रवण झाल्याचे दिसलें मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या स्थिती कायम राहिली. या मुळे मनसे ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील निवेदनातील मागण्याबाबत जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचे नेतृत्वात स्मरणपत्र देण्यात आले असून या उपर विजेच्या विविध प्रश्ना बाबत तातडीने उपाययोजना ण केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वडकी परिसरातील गावांमधील विद्युत पुरवठेचा विजेचा लपंडाव सारखा सुरू असुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विज आली कि लगेच परत जाणे, परत येणे, दिवसांत किती तरी वेळ सारखं हेच सुरु आहे तसेच थ्री फेज वीज पुरवठा रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या जीवाला अत्यंत धोकादायक आहे बऱ्याच वेळी रात्रीच्यावेळी साप, विंचु, शेतातील वीज पुरवठा पेटीमध्ये आढळून येत आहे आणि शेतात जातांना येतांना सरपटणारे प्राणी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तरी तो दिवसभर १२ तास थ्री फेज विज पुरवठा सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यात यावा, व सध्या गावांमध्ये बरेच गावातील ट्रांसफार्मर निकामी होऊन आहे, कित्येक शेतकऱ्यांचे माल कपाशी, तुरी वाळण्याच्या तयारीत आहे आधीच अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतकरी हवादील झालेला आहे तरी लवकरात लवकर नविन ट्रांसफार्मर बसविण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल असे आव्हान मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केले, यावेळी तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, तालुका संघटक नरेंद्र खापणे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदीप कुटे, तालुका उपाध्यक्ष अक्षय आडे, विभाग अध्यक्ष दिपक वरटकर विभाग उपाध्यक्ष अमर आत्राम, विभाग उपाध्यक्ष सचिन बोंडे, विनोद जांबुळकार, प्रसिद्धि प्रमुख स्वप्निल नेहारे, विभाग उपाध्यक्ष अमोल गेडाम, कल्लुमामा पठाण, अविनाश बलकी, श्रीकांत मोहितकर, परीसरातील शेतकरी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
