
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातिल सततच्या नापिकेमुळेच शेतकरी व्यसना आधीन होऊन आत्महत्या करत असल्याची माहिती. माजी ए.एस.आय. अशोक राव भेंडाळे यांनी झाडगाव येथे गजानन महाराज मंदिरात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारा आयोजित एका कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे. सविस्तर वृत्त असे. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्या ग्रस्त म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात या जिल्ह्याची ओळख आहे. परंतु या जिल्ह्यात आत्महत्या मागचे कारण काय? याचा शोध अजू तरी कुणी लावला काय? नाही. माझ्या माहितीप्रमाणे आज माझ्या सर्विस ला. ३५ वर्ष ४ महिने 23 दिवस झाले आहे मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना मला जास्तीत जास्त व्यसनाधीन लोकांनीच आत्महत्या केल्या असे माझ्या सर्वे मध्ये आढळून आले आहे. यामध्ये शेतकरीच आत्महत्या करत नाही तर शेतमजूर गोरगरीब कुटुंबातील लोकांनी सुद्धा आत्महत्या केल्या आहे. याचे कारण म्हणजे आपल्या इथे दारू. जुगार, मटका हे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम व छुप्या पद्धतीने सुरू आहे. यावर मात्र कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. आज शेतकरी हा आत्महत्या सततच्या नापिकी मुळेच करतो हे इथपर्यंत बरोबर आहे परंतु शेतकरी थोडेफार कमाई झाली की कुणी जुवा, खेळतात तर कुणी मटका लावतात तर कोणी दारू पितात त्यामुळे त्यांना आपले कुटुंब सांभाळणे कठीण होतात अशा परिस्थितीमध्ये मग शेतकरी शेतमजूर हे टोकाची भूमिका घेऊन आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न करतो. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा, पाटण बोरी येथे मोठ्या प्रमाणात खुलेआम जुगार, मटका क्लब सुरू आहे तर शेतकरी आपला कापूस, तुर, सोयाबीन विकल्यानंतर दारू पिऊन थेट पाटणबोरी व पांढरकवडा येथे क्लब मध्ये जाऊन पैसे हरतात पैसे हरल्यानंतर दारूच्या नशेमध्ये आपली जीवन यात्रा संपवितात. व आपले कुटुंब उघड्यावर सोडून जातात हे कशामुळे निव्वळ दारू जुगार मटका यामुळे. जर वेळेच या जिल्ह्यात अवैध व्यवसाय म्हणजे जुगार, दारू, मटका यासारख्या अवैध धंद्याला लगाम लावला नाही तर महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात आत्महत्या ग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख होणार. जर आपण वेळेत या जिल्ह्याकडे लक्ष दिले तर नक्कीच या जिल्ह्यात आत्महत्या होणार नाही.जर यवतमाळ जिल्ह्यातील दारू जुगार मटका यासारखे क्लब त्वरित बंद न केल्यास यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळ अवैध धंदे वाल्यांच्या विरोधात प्रचार करून उपोषणाला बसणार असल्याचे वक्तव्य माजी ए.एस.आय. अशोक भेंडाळे यांनी झाडगाव येथे एका कार्यक्रमांमध्ये केले आहे
