
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रभाग क्रमांक तेरा शिवाजी नगर येथे काल सकाळी मजूर श्याम लक्ष्मण परचाके यांच्या घराला अचानक आग लागली आणि अवघ्या काही वेळातच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्या सह सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत …
घरमालक या आकस्मिक दुर्दैवी घटनेमुळे खूप हताश, हतबल झाला पण आपली ही काही सामाजिक बांधिलकी आहे,”फूल नाही तर फुलाची पाकळी” या उक्तीप्रमाणे राळेगांव पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मेहता यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांची आर्थिक मदत या दाम्पत्याला दिली आहे…
यावेळी प्रभाग क्रमांक तेरा च्या नगरसेविका सौ अश्विनी प्रदीप लोहकरे, नगरसेवक तथा साप्ताहिक आत्मबल चे संपादक मंगेश राऊत, अध्यक्ष प्रकाश मेहता यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली आहे..
यावेळी पत्रकार संघाचे सचिव गजेंद्र कुमार ठूणे, महेश शेंडे, फिरोझ लाखाणी, संजय दुरबुडे, रणजित परचाके,सह बंडू लोहकरे, नितीन कोमेरवार, मनोज पेंदोर, रुपेश कोठारे,सह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती…
काल छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती सह इतर दानशूर व्यक्तींनी सात हजार रुपयांची मदत दिली आहे हे विशेष….
