
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी.
जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघाली अनेकांनी अर्ज केले जाहिरातीमध्ये असा उल्लेख असायला पाहिजे होता की एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो परंतु या जाहिरात आणि संपूर्ण यंत्रणेच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पतीच्या नावाने अगोदरच खेड्याचे केंद्र असताना पत्नी शहराच्या पात्र यादीत कशी असू शकते?? सीएससी केंद्र दुसऱ्या गावचे तर आपले सरकार केंद्राची मागणी वेगळ्याच गावातून तरी ही प्रकिया पुढे सरकून अंतिम टप्प्यापर्यंत येऊन आपल्या भिडूला त्या केंद्राची अडचण निर्माण होऊ शकते या दृष्टीने ते गाव खेड्यातील केंद्र रद्द करण्याची प्रक्रिया आधीच केली गेली?? म्हणून यातून या प्रक्रिये बाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शहरात पात्र यादी पत्नीचे नाव आल्याने पतीने खेड्यावर असलेली त्याच्या नावाचे केंद्र मागील तारखेत सरेंडर करण्याचा खटाटोप सुरू केल्याचे ऐकिवात असून हा बहारदार व अन्यायी सल्ला व मदत करणारा यंत्रणेतील अधिकारी कोण? एक यंत्रणेतील मोठा अधिकारी आमचा खास असल्याने आमचे काहीच वाकडे होऊ शकत नाही असे उघडपणे बोलून ही मंडळी अविर्भावात व मुक्तपणे उघड बोलत आहेत. इतके दिवस खेड्याच्या केंद्रावर हक्क दाखवत मलिदा लुटला आता त्यापेक्षा जादाच्या लालसेने खेड्याचे केंद्र रद्द करून शहरातील पत्नीच्या नावाने केंद्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत?? वास्तवात हा प्रकार म्हणजे त्या खेड्यातील व शहरातील एका होतकरू व्यक्तीच्या रोजगाराचा बळी घेणे होय अस बोलल्या जात आहे. जाहिरातीमध्ये गट ग्रामपंचायत आहे त्या गावात केंद्र जागा काढली परंतु आपला फेवरेट पर्सन सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत ऐवजी त्यात येणाऱ्या गावाला केंद्र जागा काढण्यात आली?? असा दुजाभाव करण्यामागे शासनाच्या हेतूमध्ये दोष असल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे. अत्यंत कर्तव्य तत्पर व न्यायप्रिय जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना यांनी या प्रक्रियेकडे लक्ष देऊन अशा प्रकारच्या चुकीचे काम होत असेल तर त्यावर अंकुश लावून शासनाची दिशाभूल करणाऱ्या वर त्यांच्यासाठी नियमांना बगल देणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे विविध क्षेत्रात पारदर्शकता यावी म्हणून सरकार आणि शासन प्रयत्नशील असताना काही व्यक्तींचे हितसंबंध झोपण्यासाठी हेराफेरी करणाऱ्यांना देखील आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट::
सीएससी केंद्राचे अतिरिक्त गुण मिळण्याच्या लालसेने पतीने पत्नीच्या नावाने तात्काळ सीएससी केंद्र मंजूर करून घेतल्याचं ऐकिवात असून याचा काहीही अडथळा येऊ शकत नाही कारण आपला उमेदवार हा शैक्षणिक दृष्टिकोनातून उच्च पदवी प्राप्त असल्याने ते गुण आपल्याला सहजपणे मिळू शकतात हे पतीराज जाणून होते पण स्वतःच्या नावाने खेड्याचे केंद्र असल्याने याचा अडथळा निर्माण होऊन पत्नीचे केंद्र रद्द होऊ शकते यासाठी पतीराज उलथापालथ करून केंद्र आपल्याच पदरात पाडून घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.जर वेळोवेळी जाहिरातीत प्रसिद्ध झाल्या व असेच नियमात आपल्या भिडू साठी लवचिकता येत राहिल्यास सुशिक्षित बेरोजगार शासनाच्या जाहिरातीवर व यंत्रणेवर विश्वास ठेवल ??
