
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार भारतीय बौध्द बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोध गया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी दिं .३ मार्च २०२५ रोज सोमवारला राळेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच तसेच तालुक्यातील बौद्ध बांधव आंबेडकरी संघटना व विचारवंत अनुयायांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले
बिहार राज्यातील बोध गया येथील बुध्द विहार सम्राट अशोक कालीन आहे. त्याला एक इतिहास आहे. २५०० वर्षापासून बौध्द संस्कृती भारत वर्षामध्ये नांदत आहे. परंतु बोध गया विहारामध्ये गैरबौध्दांचे व्यवस्थापन आहे. त्या लोकांचे व्यवस्थापन आम्हाला मान्य नाही. याकरीता भारत देशातील अनेक भिक्खू व भिक्खू संघ सत्याचा आग्रह (सत्याग्रह) गेल्या काही दिवसापासून बोध गया विहारासमोर बसलेले आहे. बोध गया विहाराला गैरबौध्द व्यवस्थापन करणाऱ्याला हटवावे व बौध्द विहाराला मुक्त करावे. १९४९ चा महाबोधी व्यवस्थापन कायदा रदद करावा व विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौध्द समुदयाकडे द्यावे कारण मंदिराचे व्यवस्थापन हिंदू करतो, मस्जीदचे व्यवस्थापन मुल्लामौलवी करतात, चर्चचे व्यवस्थापन पादरी करतो, मग बौध्द विहाराचे व्यवस्थापन भिक्खूंकडे का नाही? देवू नये अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले असून निवेदन देतेवेळी राळेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अंकुश मुनेश्वर,बाबा नगराळे,इंद्रजीत लभाने,ओमप्रकाश फुल माळी, विठ्ठल लढे,गोवर्धन वाघमारे, देवराव नाखले,गुरू नगराळे,विनायक नगराळे, विनायक गोटे, अक्षय ढाले, अक्षय नगराळे, उमेश कांबळे, भीमराव वागदे, नितीन कांबळे, राहुल उमरे, निमिता लभाने, संगीता नगराळे,नालंदा तेलतुंबडे, चंदा नगराळे, अनिता पाईकराव,रत्नमाला जीवने, माधुरी मेंढे,प्रभा दारुंडे,वंदना ताकसांडे, लता घोषे, महानंदा भगत, चंद्रकला बुरबरे, सारिका मून ललिता मानकर, आदी बौद्ध उपासक उपसिका उपस्थित होत्या
