
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तत्कालीन खासदार तसेच विद्यमान आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नाने यवतमाळ शहराकरीता नविन 33 केव्हीचे सबस्टेशन मंजुर झालेले असून लवकरच त्याची उभारणी केली जाणार आहे. या सब स्टेशन करीता पीकेव्ही ची 2 एकर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार भावनाताई गवळी यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे केली आहे.
पिंपळगाव, वाघापूर, बांगर नगर, लोहारा, वंजारी फैल, स्टेट बँक चौक इत्यादी भागात उन्हाळ्यात दिवसातून चारवेळा तसेच रात्री बेरात्री सुध्दा विजेचा पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शहरातील नागरीक त्रस्त झाले होते. विजेच्याया लपंडावामुळे व्यावसाईकांचे मोठे नुकसान होत असल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी नागरीक तसेच व्यावसाईकांसह विज वितरण कार्यालयात जाऊन अधिक्षक अभियंत्याला जाब विचारला होता. दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा दिला होता. विज वितरण चे अधिक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी यवतमाळ शहराला विज पुरवठा दोन सब स्टेशनवरुन होत असून ओव्हरलोड मुळे विज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगीतले होते. तांत्रीक अडचण लक्षात येताच पिंटु बांगर यांनी तत्कालीन खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे पाठपुरावा करुन ही मागणी रेटून धरली. खासदार भावनाताई गवळी यांनी खासदार असतांना शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत 33 केव्हीचे सबस्टेशन मंजुर करुन आनले. या सबस्टेशन करीता शासनाकडून इक्लास जमिनीची मागणी करण्यात आली मात्र मागणी स्थित इक्लास जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे भावनाताई गवळी यांनी पंजाबरावकृषी विद्यापिठाची २ एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. ही जमीन उपलब्ध करुन दिल्यास लवकर 33 केव्ही चे सबस्टेशन उभारुन शहराला सुरळीत विद्युत पुरवठा केल्या जाऊ शकतो. विशेष म्हणजे पीकेव्हीची जागा दिल्यास या भागातून तीन फिडर जाऊ शकत असल्यामुळे अधिक सोईचे ठरणार असल्याचे विज वितरणच्या अधिका-यांचे मत आहे. त्यामुळे आमदार भावनाताई गवळी प्रामुख्याने पीकेव्ही च्या जागेकरीता पाठपुरावा करीत आहे.
पाठपुरावा करत राहणार
मी खासदार असतांना यवतमाळच्या नागरीकांनी मला भरभरुन प्रेम दिले. त्यांच्या समस्या सोडविने हे माझे कर्तव्य आहे. विजेचा पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे नागरीकांच्या मागणीनुसार मी यवतमाळ करीता सबस्टेशन मंजुर करुन आनले. आता त्याकरीता आवश्यक असलेली जागा मिळवून देण्याकरीता पाठपुरावा करीत आहे.
- भावनाताई गवळी आमदार, विधान परिषद
