
सहसंपादक: रामभाऊ भोयर
अस म्हणतात की लहानपण हे खेळण्यात, बागडत सोबतच शिक्षकांनी लावलेल्या शिस्तीत आपला दिनक्रम सुरू करण्यात जातो. इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असलेली कु. सई रुपेश नैताम नेहमीप्रमाणे आपल्या दिनक्रमानुसार न चुकता वेळेवर शाळेत आली व आपल्या वर्ग मैत्रिणी मधे रममाण झाली. शाळेत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंतर्गत शालेय आरोग्य तपासणीच्या दरम्यान कु. सई रुपेश नेताम हिच्या हृदयाचे ठोके हे विचलित करणारे असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांना दिसून आले त्यांनी व शाळा प्रशासनाने सईच्या पालकांशी चर्चा करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे काही तपासण्या केल्यात तसेच आलेल्या अहवालानुसार कु. सई च्या हृदयाला छेद असल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. शीतल बलेवार, संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकूलवार, डॉ. राजेश लोणारे, डॉ. जयश्री दिघडे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. सई च्या पालकांना धीर देत पुढील उपचारासाठी व शस्त्रक्रिया साठी सत्य साईज्योत संजीवनी हॉस्पिटल खारघर, मुंबई येथे हलविण्यात आले व तिथे कु. सई हिच्यावर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.ही माहीती मिळताच शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाखाणण्याजोगी बाब ही की ईतकी मोठी शस्त्रक्रियेनंतर एक, दीड महिना आराम करून पुन्हा नव्याने कु. सई शाळेच्या वातावरणात रममाण होऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. या वरुण एकंदरीत पालकांचा शाळेवरचा विश्वास व सहकार्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व सई च्या पालकांनी शाळा प्रशासनाचे विशेष करून मुख्याध्यापिका तथा संचालिका डॉ. शीतल बलेवार, संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकूलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश लोणारे, डॉ. जयश्री दिघडे व मार्कंडेय पब्लिक स्कूल चे सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
