
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी :राळेगाव तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक आदर्श शाळा, पिंपळापूरचे प्रियांशू सातकर, कु. निधी लिहीलकर, कु. मृणाली नहाले व कु. पुनम कोहळे असे चार विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
NMMS शिष्यवृत्ती ही केंद्र सरकार पुरस्कृत असून यामध्ये पात्र होणाऱ्या विद्याथ्यांना प्रति वर्षी १२,००० रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षे म्हणजे १२ वी उत्तीर्ण होईपर्यंत एकूण४८००० रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.
पिंपळापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदिप कचवे यांच्या नियोजनानुसार या शाळेमध्ये एनएमएमएस, महादीप, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशा अनेक परीक्षांचे ज्यादा वर्ग घेतल्या जाते. थात NMMS परीक्षेचे मुख्य मार्गदर्शक श्री-मंगेश गोडबोले, श्री. राहुल बोरडे यांचे विशेष परीक्षम आहेत. तसेच श्री. सचिन कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभते. पिंपळापूर शाळेत एकूण आठ वर्ग व १२३ विद्यार्थी असून चारच शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची कमतरता असताना सुद्धा योग्य नियोजन करून NMMS, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, महादीप परीक्षा, विज्ञान प्रद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, ज्ञान प्रदर्शनी, तालुकास्तरीय व जिल्हा-स्तरीय क्रीडा स्पर्धा या सर्वच उपक्रमामध्ये पिंपळापूर शाळा राळेगाव तालुक्यात अव्वल ठरली आहे हे विशेष .वरील सर्व उपक्रमामध्ये पं. स. राळेगावचे गट शिक्षणाधिकारी श्री. राजू काकडे, विस्तार अधिकारी श्री. निलेश दाभाडे व श्री. नवनाथ लहाने तसेच केंद्रप्रमुख श्री अनिल वरूडकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.
शाळेला मिळालेल्या यशाबद्दल शा.व्य. समितीचे अध्यक्ष श्री योगेश शेंडे, उपाध्यक्षा सौ. शालिनीताई सातकर, सरपंच श्री. रविंद्र चौधरी, उपसरपंच श्री. किशोर नहाते, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री मोहन पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व पिंपळापूरचे सर्व ग्रामस्थ यांनी कौतुक केले तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळापूर च्या शिक्षकांच्या नियोजना बद्दल व विद्यार्थी घडविण्यात असलेल्या आस्थे बद्दल या शाळेच्या सर्व शिक्षकां वर कौतुकाचा व अभिनंदन चा परिसरातून वर्षाव होत आहे
