
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नालवाडी परिसरातील, आदर्श नगर, आशीर्वाद नगर, देशपांडे लेआऊट, सु राना लेआऊट मधील महिला मागील बऱ्याच वर्षांपासून नियमित योगाचे वर्ग घेत असतात परंतु या परिसरात योगा व व्यायामासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जवळ असलेल्या संत बऱ्हाणंपुरे महाराज हॉल येथे योग वर्ग घेतात. परंतु तिथे लग्न प्रसंग किंवा इतर कार्यक्रमामुळे मर्यादा येत असतात… पावसाळ्यात अनेक अडचणी येत असतात त्यामुळे हा परिसरात चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने योग व व्यायाम सुविधा उपलब्ध व्हाव्या त्याकरिता शेड व ओपन जिम उपलब्ध करून द्यावा म्हणून पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांना भेटून निवेदन देण्यात आले.डॉ पंकज भोयर यांनी निवेदन स्वीकारून त्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला .. पालकमंत्री यांनी व्यस्त कार्यक्रम असताना स्वतः गाडीतून उतरून, चर्चा करून महिलांचे निवेदन स्विकारले, या प्रतिसादामुळे महिल्यांनी आनंद व्यक्त केला… निवेदन देतेवेळी सौं किरण गुल्हाने,रुपाली भोयर, लता येणोरकर,सुरेखा भोले,शुभांगी भोगे, बेबी नाज शेख,उषा इखार, अर्चना केवटे,सरला कीर्तने व इतर महिला उपस्थित होत्या
