
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील तरुण शेतकरी नागेश वसंत अंबाघरे (वय ४२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून रात्री दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्याकडे केवळ ३ एकर शेतजमीन असून, त्या जमिनीवर शेती करत असताना त्यांच्यावर अथोनात कर्ज, बेसिक कर्ज, सावकारी कर्ज तसेच सोसायटीचेही कर्ज झाले होते. या वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली ते त्रस्त झाले होते. मानसिक तणाव वाढल्याने त्यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
अधिकृत तपास पोलिसांकडून सुरू असून, पुढील माहिती प्रतीक्षेत आहे.
