मा. गजानन मुंडकर गटविकास अधिकारी पं. स. वरोरा यांच्या नेतृत्वात मा. ज्ञानेश्वर चहारे गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा व शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्वेता लांडे यांनी या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला ” मिशन नवोस्काॅलर ” हा उपक्रम सुरू केला होता . या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांकडून नवोदय आणि स्काॅलरशिप परीक्षांच्या पेपर्स चा सराव करून घेण्यात आला . या उपक्रमासाठी च्या खर्चाची जबाबदारी मा. गजानन मुंडकर यांनी उचललेली होती आणि आयोजनाची जबाबदारी श्वेता लांडे मॅम यांच्या नेतृत्वात पं. स. तील शिक्षकांनी उचललेली होती .
नुकत्याच जाहीर झालेल्या स्काॅलरशिप परीक्षेत पं. स. वरोरा येथिल जि. प. शाळांचे इयत्ता ५ वी – पूर्व माध्यमिक तब्बल २६ विद्यार्थी तर खाजगी शाळांमधील ४४ विद्यार्थी पात्र ठरलेले आहे . त्याचप्रमाणे इयत्ता ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती साठी एकूण २७ विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत . पं. स. वरोरा च्या या घवघवीत यशात ” मिशन नवोस्काॅलर ” चा सिंहांचा वाटा आहे .
गटशिक्षणाधिकारी
मा. ज्ञानेश्वर चहारे
पं. स. वरोरा
