
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एचटीबीटी कपाशीच्या बियाण्याची लागवड केली या लागवडीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी चोरट्या मार्गाने का होईना आपल्या शेतामध्ये एचटीबीटी कपाशीची लागवड केली एचटीबीटी कपाशीची ची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने शासनाने शेतकऱ्यांना एचटीबीटी कपाशी लागवड करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहेत llllएचटीबीटी कपाशीवर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तननाशक फवारता येते त्यामुळे निंदन करण्याची गरज पडत नाही परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो शेतकऱ्यांना शेतमजुरीचे वाढत असलेले दर मजुरांची टंचाई मजुरांची हाजी हाजी करणे या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही बरेच दिवस पाऊस शेतात पडत राहिलास शेतात डवरण्याचे फेर होत नाही परिणामी शेतात तन वाढते सर्वांच्या शेतात हीच परिस्थिती राहत असल्याने मजूर निंदनीचे दर वाढवतात वेळेवर मजूर मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये मजुराची टंचाई निर्माण होते मजूर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेत पडीत पडतात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो अलीकडच्या काळात कपाशीच्या पिकाबाबत उत्पादन खर्च उत्पन्न आणि कापसाला मिळत असलेला बाजार भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एचटीबीटी कपाशीची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे चोर मार्गाने मिळत असलेली एचटीबीटीचे तंत्रज्ञान हे 5g पर्यंत गेले आहेत आणि मार्केटमध्ये अजूनही बीजी टू बियाणेच मिळत आहे एचटीबीटी पासून शेतकऱ्यांना उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी होते शिवाय काही प्रमाणात कमी झाले तरी उत्पादन खर्च त्याला जास्त नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये एचटीबीटी कपाशीची लागवड केली आहे एका अंदाजानुसार जवळपास तालुक्यातील साठ टक्के शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये एचटीबीटी कपाशीची लागवड केली आहे ही कपाशी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने शासनाने सुद्धा या कपाशी बियाण्याला मान्यता द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरत आहेlllll प्रतिक्रिया शेतकरी सचिन हूरकुंडे, एचटीबीटी कपाशी बियाण्यावरती डायरेक्ट तन नाशक फवारता येत असल्याने या कपाशी वरती रोगराई कमी येते तसेच बीजी टू कपाशीच्या बियाण्यापेक्षा या कपाशीला अधिक पातीफुल बोन्ड येते त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढते खर्च कमी आणि उत्पादन जास्त एचटीबीटी देत असल्याने शासनाने एचटीबीटी लागवडीला मान्यता द्यावीllll शेतकरी हरीश झांबरे अलीकडच्या काळात शेतीसाठी सालगडी मिळत नाही सालगडी मिळत नसल्याने घरी बैल ठेवू शकत नाही बैल नसल्याने कपाशीमध्ये डवरनीचे फेर होत नाही एचटीबीटी कपाशी बियाण्यावरती डायरेक्ट तन नाशक फवारता येत असल्याने फारसे डवरणीचे फेर द्यायची गरज पडत नाही शिवाय उत्पादनही बरे होते त्यामुळे शासनाने एचटीबीटी बियाणे लागवडीकरता परवानगी द्यावी lllllप्रतिक्रिया तीन शेतकरी सुरज काळे गेल्या दोन वर्षापासून राळेगाव शहरांमध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अति पावसामुळे शेतात तणाचे साम्राज्य असते वेळेवर मजूर मिळत नाही मजुरीचे दरही खूप असतात शेतात फवारणी ही शक्य नसते गेल्या वर्षी ड्रोन द्वारे शेतात फवारणी केली पाऊस जास्त असला तरी एचटीबीटी बियाण्यावरती तन नाशक फवारता येते अति पावसाचा एचटीबीटी कपाशीला पाहिजे तितका फटका बसत नाही त्यामुळे शासनाने एचटीबीटी कपाशीला मान्यता द्यावी
