
पांदण रस्त्याच्या समस्येबाबत अनेकदा निवेदन देऊनही ग्रामवासियांच्या समस्येवर उपाय न करता उलट ग्रामस्थ शेतकरी यांनाच दमदाटी करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात संतप्त होत या भागातील शेतकरी बैलबंडी सह तहसील कार्यालयात धडकले.नायदेव मोहबाळा पांदण रस्त्यावरून मागील अनेक वर्षे शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर आता कोळश्याची जड वाहतूक सुरू झाल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून, शेतकरी, शेतमजूर,विद्यार्थी तहसील कार्यालयात आले. तहसीलदार प्रशांत बेंडसे यांना निवेदन देत समस्यांबाबत अवगत केले यावेळी नायदेव मोहबाळा सरपंच नंदलाल टेमुर्डे ,दहेगाव सरपंच विशाल पारखी, मनसे नेते रमेश राजूरकर,सुनील काळे, जयंत टेमुर्डे,उत्तम निखाडे तसेच असंख्य महिला, विद्यार्थी यावेळी उपस्थिती होती.
