
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 19 ऑगस्ट रोजी राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिंपळखुटी तलाव परिसरात गावठी दारूची विक्री सुरू आहे. त्यानुसार सपोनी दंदे, पीएसआय बोरकर, नापोका विशाल कोवे व चापोशी प्रतीक्षा तिथरमारे यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.छाप्यामध्ये शेषराव हिरवा चव्हाण, रा. जोडमाहा हा गावठी दारू गाळताना मिळून आला. त्याच्याकडून ५ लिटर गावठी दारू (किंमत रु. ५००/-) व दारू गाळण्यास उपयुक्त ५० लिटर मोहमाच सोडवा (किंमत रु. ५,०००/-) असा एकूण रु. ५,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर पोलीस पथकाला ग्राम सोयती शिवारात आणखी एक ठिकाणी दारू गाळणी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. येथे नूतन नरेश काळे हा जागीच मिळून आला. त्याच्या ताब्यातील चार ड्रममध्ये अंदाजे ४५० लिटर मोहमाच सोडवा दारू काढण्यास उपयुक्त असा सुमारे रु. ४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरचा सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला तसेच उर्वरित साहित्य जागीच नाश करण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.ही कारवाई माननीय पोलीस निरीक्षक मालटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दंदे, पो. उपनि. बोरकर, नापोका विशाल कोवे व मोपोशी प्रतीक्षा तिथरमारे यांच्या पथकाने केली.
