
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
कडाक्यातील उन्हाळ्याचा तीव्र उकाड्याने मनुष्यप्राणी सध्या स्थितीत भयंकर त्रस्त असून त्यात अजून एक भर म्हणजे राळेगाव शहरातील सतत होणारा विजेचा लपंडाव, तिला वेळच नाही कोणत्याही वेळी, दिवसा रात्री कोणत्याही वेळेस, तिचा मनमानी कारभार सुरु असून दहा मिनिटांसाठी वीज जाते दहा मिनिटानंतर येते पुन्हा एक दीड तासाने दहा मिनिटांसाठी जाते पुन्हा येते असं विजेचा सतत नित्यक्रम चालू आहे. शहरात गेले किती दिवसा पासून या विजेचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विजेवर चालणारे व्यवसाय, मोटारी बंद राहत असून नागरिकांच्या कामात बाधा ठरताना दिसत आहे. मार्केट मधील अनेक विजेवर चालणारी दुकाने बंद राहत असून व्यवसायावर परिणाम होत आहे असे दुकानदारानं कडून बोलें जात आहे. रात्रीला विज गेल्यानंतर संपूर्ण शहरात सर्वत्र काळोख पसरलेला असतो अशातच संधी साधू चोरांकडून सोनार लाईन, मेन लाईन, आठवडी बाजार व शहरातील वस्त्या मध्ये चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे काही घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? अजून तर पावसाला सूरूवात झालेली नसून पावसाळ्यात काय होईल कोणास ठाऊक नाही. थोडा वारा आला पाऊस आला कि विजेचा त्रास होणार हे सद्यस्थितीतून दिसून येत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राळेगाव शहरातील महावितरण यशस्वी होणार का? ग्राहकांनी इमानदारीने महिन्याचे विज बिल भरून सुद्धा त्याला या विजेच्या लपंडाव खेळाचा नाहक त्रास सहन करावा लागणार का ? महावितरण चे अधिकारी सदर प्रकरणास गांभीर्याने घेणार का ? ग्राहकांना सुरळीत सेवा देणार का ? असा संतप्त सवाल नागरिक करताना दिसत आहे. पुढे याचा त्रास नं व्हावा यासाठी योग्य नियोजन करून फिडर मेंटेनंस, लाईन ट्रिप, खुल्या असलेल्या डिप्या बंद करणे, इत्यादी प्रकारचे संबंधित असलेली वेगवेगळी कामे यांचा आधीच बंदोबस्त करण्यात यावा, विजेच्या तारावरील झाडे तोडण्यात येऊन विज सुरळीत सुरु करण्यात यावि अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
