
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली रोडवर कचरा डपींग लगतच्या जंगलात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह 17 तारखेला पोलिसांना मिळाला पोलिसांनी मृतकाची ओळख पटवून हत्या हत्या केलेल्या आरोपीला आज अटक करण्यात आले वारंवार पैशाच्या होत असलेल्या मागणी आरोपीने महिलांच्या हत्या केली राळेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली रोडवर कचरा डपींगच्या परीसरात मृतक आरती शरद कोवे.वय ३५ वर्षे .रा.पिंप्री दुर्ग ही महीला दिनांक १६/८/२४ रोजी दुपारच्या सुमारास राळेगाव येथे बाजारात जाते म्हणून घरुन गेली होती. मृतक महिलेने सदर आरोपीला फोन लाऊन बोलाविले दोघांनीही जंगल परिसरात जाऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले .मृतक महिला आरोपीस वेळोवेळी पैश्याची मागणी करीत होती. आरोपी हा अविवाहित असल्याने त्याला विवाह करण्यास अडचण निर्माण होत असल्याने रागापोटी आरोपीनी आरती शरद कोवे या महीलेचा खुन केला. मृतक महिलेचा पती दीपक हा नागपूर येथे रेस्टॉरंट मध्ये काम करतो. मृतक महिलेला एक मुलगी व मुलगा असून मुलगी हे वर्ग पाचवी शिकत आहेत तर मुलगा वर्ग दुसरी मध्ये शिकत आहेत सदर घटनेतील माहीती राळेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांना मिळतात पोलिस सहकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचुन सदर घटनेचा पंचनामा केला मृतकाला शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेतील आरोपी दर्शन उर्फ गणेश दिलीप येपारी वय २१ वर्षे रा .शांतीनगर राळेगाव याला १२ तासात राळेगाव पोलिसांनी अटक केली असुन आरोपी विरुद्ध अ.क्र.३१२/ २४ कलम १०३ (१) भा.न्यायसहिं सह कलम( ३) (२) (व्हि) अ.जा.ज.अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे हे करीत असून राळेगाव पोलीस स्टेशन गोपनीय माहितीनुसार आरोपीला काही तासात अटक केली या कारवाईत राणे बोरकर साहेब,जमादार गोपाळ वॉट्सर,सूरज चिव्हणे, मोहाडे,रूपेश जाधव,विशाल कोवे,योगेश वाघमोडे,राजु शेडे हे पोलीस कर्मचारी सहभागी होते
