
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खैरी परिसरातील शेत शिवारातील खैरी, वडकी, विरूळ, धानोरा रिठ या पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून पांदण रस्ता तयार होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. मात्र त्यांना पांदन रस्ता तयार करून मिळत नाही आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वर्षापासून येथील शेतकरी शासन दरबारी पांदण रस्त्यासाठी सतत जाऊन त्रस्त झाला आहे मात्र त्यांचा पानंद रस्त्याचा वनवास संपण्याची चिन्हे दिसत नाही खरीप पिकाच्या पेरण्यासाठीही या अति खराब पानंद रस्त्यांनि शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला.आता खरिपाची पिके काढणीला येत असून पुढे रब्बी पिकासाठी शेती मशागतीची कामे करायची आहे मात्र खराब पांदण रस्त्यामुळे रस्त्यामुळे शेतकऱ्यांना भयंकर त्रास होत आहे याकडे पालकमंत्री साहेब व लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही लक्ष देण्याची मागणी खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कित्येक वर्षापासून मागणी करून आज पावतो खैरी- वडकी ,खैरी -विरू ळ, खैरी- धानोरा रिठ, खैरी -सावित्री पांदन रस्ता अद्यापही बनला नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांना शेतकामासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी पांदण रस्त्याचे निवेदन देऊनही शासन दरबारी दरबारी हेलपाटा मारूनहि शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्या परिसरातील शेतकरी या नाहीतर पुढच्या वर्षी होईल या प्रतीक्षेत आहे मात्र खैरी परिसरातील पांदण रस्ते काही तयार होऊनच नाही राहिले. त्यामुळे खरीप व रब्बी पिकाच्या काढणी व मशागतिकरीता करिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्यातील आहे व ते कार्य तत्पर आहे. त्यामुळे शेतकरी पालकमंत्री साहेबाकडून यावेळी पांदन रस्ते बनवून मिळतील अशी आस खैरी परिसरातील शेतकरी धरून आहे.
खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना कार्यालयात जाऊन निवेदन दिले त्यावेळी निधी आला की रस्त्याचे काम करू असे त्यांनी आश्वासन दिले. परंतु अजूनही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर हे पांदण रस्ते इतके भयंकर खराब झाले असून ह्या पांदन रस्त्यावर भरपूर खड्डे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांदण रस्ते खराब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीच्या व इतर कामांकरिता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बैलासह शेतकऱ्यांनाही पांदण रस्त्याने चालताना खूप त्रास होत आहे. बैलाच्या पायाच्या पायाच्या या पांदन रस्त्याने चालताना खुऱ्या फुटत आहे मात्र ते मुके जनावर असल्यामुळे आपल्या वेदना कोणालाही सांगू शकत नाही हे मात्र विशेष. परंतु शेतकरी शासन प्रशासन दरबारी या रस्त्यासाठी आपले झीजवीत आहे मात्र प्रशासनाला जाग येत नाही हेही विशेष आहे.
तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन आधीच अतिवृष्टीने जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना आता यावर्षी तरी शेतात जाणे येणे सुलभ व्हावे याकरिता पांदण रस्ते प्रशासनाने पांदण रस्ते चांगले तयार करून द्यावे अशी खैरी परिसरातल्या शेतकऱ्याकडून कळकळीची मागणी होत असून असून यावर्षी तरी पांदण रस्ते शासनाने तयार करून द्यावे व व शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा वनवास संपवावा अशी खैरी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.तरी पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचेच असल्याने ते या मागणीकडे कसे लक्ष घालते व पांदन रस्ते कधी निर्माण करते की पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखेच राहते की खैरी परिसरातील शेतकऱ्यांचा पांदन रस्त्यासाठीचा वनवास संपतो याकडे खैरी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
