
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा ते रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरीता धानोरा येथील शेतकरी यांच्या गट क्र.७ ०.८ आर शेत आहे. शेताच्या बाजुला पुलाचे काम सुरू करण्यात आले तेव्हा माज्या शेतात पिक असतांना पण माझे शेत खसविल्या गेले व त्यांनी सांगितले की जेवढे नुकसान होईल तेवढे होऊ द्या आम्ही तुमच्या शेताला पिचींग व रस्ता बनवुन देतो असे सांगितले होते. पण पावसाळा सुरू होऊनही शेताला पिचींग व रस्ता बनवुन न दिल्याने माज्या शेतात रस्त्या नसल्यामुळे पेरणीयंत्र किवा बैलबंडी नेता आली नाही त्यामुळे माझी जमीन पडीत राहीली असलेल्या माझे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐवढेच नव्हे तर मला बांधकाम विभागाचे इंजि, ठेकेदार व त्याचाच एक मानुस मानसिक त्रास देत आहे त्यांच्या त्रासाला कंटाळून मी व माझे कुटुंब आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असे अन्यायग्रस्त शेतकरी चंद्रशेखर सुभाष वाकडे यांनी बोलताना सांगितले. याचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, पोलिस स्टेशन वडकी यांना देण्यात आले आहे. सदर शेतकऱ्यांच्या संदभार्तील समस्या समजुन घेऊन बांधकाम विभाग, व महसूल प्रशासनाने न्याय देण्यात यावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे.
