
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज समाजात अनेक लोक दुःखी, नैराश्यग्रस्त आहे त्यांना धीर देणे तसेच सद्या अनेक संकटाचा सामना शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना करावा लागत आहे त्यांची त्यातून त्यांची सुटका करने ही आपली नैतिक जबादारी आहे, म्हणूनच सण, उत्सवा दरम्यान सामाजिक उपक्रम राबवावे असे मत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. आदर्श मंडळ हे नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवित असते, त्यांचे कार्याचे एस डी ओ साहेबांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक शितल मालटे यांनी आपल्या मनोगतातून सण उत्सव ठरवून दिलेल्या नियम अटी अंतर्गत आनंदाने साजरे करून आदर्श मंडळा सारखा एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन या व्यासपीठावरून केले.
यावेळी नगरसेविका सौ. कमरुनीस्सा हमीदभाई पठाण, सौ. पुष्पा विजय किन्नाके, सौ. रोशनी वानोडे, सौ. रूपा लाखाणी, राजू झलके, प्रदीप ठुणे, बुरले सर, वाघ सर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदिप ठुणे यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष, बालगोपालांची उपस्थिती होती. मंडळाच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयन्त केले.
