
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे भौतिकशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ विज्ञानाचा परिचय या विषयावर दिं. १ ऑक्टोंबर २०२५ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस. आर. जैसवाल, सहाय्यक प्राध्यापक, आर. एल. टी. कॉलेज ऑफ सायन्स, अकोला हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या सखोल व प्रेरणादायी व्याख्यानातून अवकाशविज्ञानाची मूलभूत तत्त्वे, उपग्रह व प्रक्षेपण तंत्रज्ञान, अवकाशातील नवीन संशोधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषत: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) कामगिरी व तरुण संशोधकांसाठी असलेल्या संधींवर त्यांनी भर दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. ए. वाय. शेख यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. डी. जगताप गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. व्हि. गोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉ. बी. एच. भट्टी यांनी केले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना अवकाशविज्ञान क्षेत्रातील गुंतागुंतीचे विषय सुलभ पद्धतीने समजून घेता आले. समारंभाच्या शेवटी ए. एस. लिहितकर यांनी मान्यवरांचे तसेच उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा वाढून संशोधन व नवोपक्रमाकडे त्यांचा कल अधिक दृढ होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
