
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिवसेंदिवस रुग्णालयात, इमारतीमधील घडत असलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आलेले अग्निशमन यंत्रणेची दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३:३० वाजता चाचणी व प्रात्यक्षिक (Mockdrill) घेण्यात आली.
सदर चाचणी व प्रात्यक्षिक दरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री अनिल बत्रा तसेच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी नीता ज. बोकडे व त्यांचे विभागाचे सहकर्मी, डॉ. आर.पी .चव्हाण, डॉ.जय राठोड ,डॉ.स्मिता सोनटक्के, डॉ.गणेश जाधव, डॉ जयवंत महादानी, डॉ.शेखर घोडेस्वार, डॉ.विनोद राठोड, डॉ बोरकर, डॉ संतोष भोसले, प्रशासकीय अधिकारी श्री.संतोष झिंजे, डॉ.अमर सुरजुशे, डॉ. दुर्गेश देशमुख, डॉ.अरविंद कुळमेथे, डॉ प्रगती बुल्ले, डॉ हर्षलता चव्हाण, अधिपरिचारिका श्रीमती माया मोरे, महाराष्ट्र सुरक्षा बल चे प्रमुख श्री. प्रदीप उबाळे, मेस्को चे प्रमुख श्री.आत्राम, श्री.अशोक कोडापे यांच्यासह महाविद्यालयातील अध्यापक, नर्सेस, कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते. यावेळी या सर्वांना फायर एक्सटीग्युषर, फायर हायड्रंट सिस्टीम, फायर अलार्म, फायर स्पिंकलर या सर्व यंत्रणेचे प्रात्यक्षिक मे. ज़ेनटेक कंपनी च्या अभियंताकड़ून करून दाखवण्यात आले.
