अधिसूचने विरुद्ध भूमिपुत्र ब्रिगेड ने पाठवल्या हरकती

पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी:- आशिष एफ. नैताम

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने अधिसूचना काढली आहे या अधिसूचने विरोधात भूमिपुत्र ब्रिगेड तालुका पोंभूर्णा येथिल कार्यकर्त्यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडे हरकती पाठविल्या आहेत. आणि ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे म्हणत ओबीसींना बुक्का देण्याचे काम सरकार करत आहे.
संविधानात सगे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असणे हा आरक्षणाचा निकष आहे तरी देखील अध्यादेश काढला तो त्वरित रद्द करावा. दरम्यान अधिसूचनेच्या विरोधात डाक कार्यालयाद्वारे हरकती पाठविण्यात आल्या यावेळी श्रीकांत शेंडे, बंडू ठाकरे, रामेश्वर सोनटक्के, सुनील कानमपल्लीवार, भूषण इप्पलवार, निखिल गुरनुले, वैभव कामटकर इतर भूमिपुत्र ब्रिगेड चे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.