[भय इथले संपत नाही ] राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे. राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. सुरेश गुलाब मते असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
वय 52 वर्ष वडिलांच्या नावाने नऊ एकर शेती असून शेती सुरेश मते करीत होता ते करत असलेल्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज आहे पण सततच्या नापिकीचे संकट असल्यामुळे कर्जाला कंटाळून विष प्राशन केले त्यांना वडनेर येते रुग्णालयात नेते वेळस प्राणज्योत मावळली.